नारायणगावला कोथिंबीर फेकण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

नारायणगाव - जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात धना, मेथी व शेपूची आवक वाढल्याने बाजारभावात मोठी घसरण झाली. बाजारभावाअभावी कोथिंबीर व शेपूच्या सुमारे दहा हजार जुड्या उपबाजार आवारात सोडून रिकाम्या हाताने घरी जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. 

पावसाने उघडीप दिल्यामुळे उपबाजार आवारात धना, मेथी व कोथिंबिरीच्या सुमारे तीन लाख जुड्यांची आवक झाली. कोथिंबीर, मेथी, शेपूच्या जुडीचे शेकडा अनुक्रमे पन्नास रुपये ते एक हजार रुपये, तीनशे रुपये ते एक हजार रुपये, पन्नास रुपये ते दोनशे रुपयांच्या दरम्यान लिलाव झाले. बाजारभावाअभावी शेपू व कोथिंबिरीच्या सुमारे दहा हजार जुड्या टाकून दिल्या.

टॅग्स