राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा 

पुणे  - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांमध्ये राज्यातील 25 शिक्षकांचा समावेश असून, यात सर्वाधिक पाच शिक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत. स्मिता करंदीकर, उज्ज्वला नांदखिले, संजीव बागूल, नंदकुमार सागर, अर्चना दळवी अशी त्यांची नावे आहेत. या शिक्षकांची 2016-17 या शैक्षणिक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे. यात तीन विशेष शिक्षकदेखील आहेत. 

शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय आणि सर्जनशील कार्य करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जातात. त्यासाठी या वर्षी राज्यातील 25 शिक्षकांची निवड झाली आहे. त्यामध्ये 17 प्राथमिक आणि 8 माध्यमिक शिक्षक आहेत. यात 2 प्राथमिक आणि एक माध्यमिक अशा तीन विशेष शिक्षकांचाही समावेश आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. या पुरस्कारांमध्ये राज्यात पुणे जिल्ह्याने ठसा उमटविला असून, जिल्ह्यातील पाच शिक्षकांची या पुरस्काराची निवड झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील 3 आणि मुंबई, अहमदनगर, बीड व लातूर जिल्ह्यातील प्रत्येकी 2 शिक्षकांचा समावेश आहे. तसेच सांगली, बुलडाणा, भंडारा, ठाणे, सोलापूर, यवतमाळ, उस्मानाबाद, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका शिक्षकाला हा पुरस्कार दिला जाणार आहे. 

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची यादी - 
प्राथमिक विभाग - 
उज्ज्वला नांदखिले (जि. प. शाळा, साडेसतरानळी, ता. हवेली, जि. पुणे) 
संजीव बागूल (जि. प. शाळा, संभवे, ता. मुळशी, जि. पुणे) 
नागोराव तायडे (जयंतीलाल वैष्णव मार्ग, महापालिका मराठी शाळा, घाटकोपर, मुंबई) 
शोभा माने (जि. प. शाळा चिंचणी, ता. तासगाव, जि. सांगली) 
तृप्ती हातिसकर (प्रभादेवी मनपा शाळा, मुंबई) 
सुरेश शिंगणे (जि. प. शाळा, पिंपळगाव चिलमखा, ता. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) 
रसेशकुमार फाटे (जि. प. शाळा, डोंगरगाव, जि. भंडारा) 
ज्योती बेळवले (जि. प. शाळा, केवनीदिवे, ता. भिवंडी, जि. ठाणे) 
अर्जुन तकटे (जि. प. शाळा, अहेरगाव, ता. निफाड, जि. नाशिक) 
रुक्‍मिणी कोळेकर (जि. प. शाळा, वांगणी, ता. करमाळा, जि. सोलापूर) 
रामकिसन सुरवसे (जि. प. शाळा, नागोबावाडी, ता. औसा, जि. लातूर) 
प्रदीप शिंदे (जि. प. शाळा, शिलापूर, जि. नाशिक) 
अमिन चौहान (जि. प. शाळा, निंभा, ता. डिग्रस, जि. यवतमाळ) 
ऊर्मिला भोसले (जि. प. शाळा, महाळदापुरी, ता. वाशी, जि. उस्मानाबाद) 
गोपाळ सूर्यवंशी (जि. प. शाळा, गांजुरवाडी, जि. लातूर) 

प्राथमिक विशेष शिक्षक 
अर्चना दळवी (जि. प. शाळा, बहुली, ता. हवेली, जि. पुणे) 
सुरेश धारराव (जि. प. शाळा, निफाड, जि. नाशिक) 

माध्यमिक विशेष शिक्षक - 
मीनल सांगोले (मूकबधिर शाळा, शंकरनगर, नागपूर) 

माध्यमिक विभाग - 
स्मिता करंदीकर (अहिल्यादेवी विद्यालय, शनिवार पेठ, पुणे) 
नंदकुमार सागर (जिजामाता विद्यालय, जेजुरी, जि. पुणे) 
नंदा राऊत (मोतीलाल कोठारी विद्यालय, कडा, ता. आष्टी, जि. बीड) 
शर्मिला पाटील (अंबिका विद्यालय, केडगाव, ता. अहमदनगर) 
सुनील पंडित (प्रगत विद्यालय, नवी पेठ, अहमदनगर) 
डॉ. कमलाकर राऊत (योगेश्‍वरी नूतन विद्यालय, आंबेजोगाई, जि. बीड) 
संजय नरलवार (प्रियांका हायस्कूल, कानेरी, जि. गडचिरोली) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com