नाट्य परिषदेच्या निवडणुकीत टपालाऐवजी थेट मतदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

मुंबई - अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या 2018च्या पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांना टपालाने मतदान करता येणार नाही, तर त्यांना त्यासाठी मतदान केंद्रावरच जावे लागेल. 

नाट्य परिषदेच्या 2013मधील निवडणुकीच्या पोलिसांपर्यंत गेलेल्या वादामुळे घटनादुरुस्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या वेळची निवडणूक पारदर्शक असेल, अशी आशा नाट्यसृष्टीतून व्यक्त होत आहे. 

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीची मुदत 30 नोव्हेंबरला संपत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, विदर्भ, मराठवाडा या विभागांनुसार मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदारांना थेट नाट्य शाखेच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे लागणार आहे. कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर लगेचच आचारसंहिता जाहीर होणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. नोव्हेंबरच्या अखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. 

नाट्य संमेलन अनिश्‍चित 
नाट्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडीपासून नाट्य संमेलन घेईपर्यंतचे निर्णय नवी कार्यकारिणी घेईल, असे सध्याच्या कार्यकारिणीने जाहीर केले आहे. जळगाव, संगमनेर, नाशिक येथून संमेलन घेण्यासाठी निमंत्रण आले आहे. आधी निवडणूक मग नाट्यसंमेलन असे सध्याचे चित्र आहे.

Web Title: maharashtra news natya parishad election