हे गेंड्याच्या कातडीचे सरकार: धनंजय मुंडे

Dhananjay Mundhe
Dhananjay Mundhe

मुंबई - सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन शेतकऱ्याने जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील या शेतकऱ्याच्या निधनाने स्पष्ट झाले आहे. या सरकारचा धिक्कार असो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Maharashtra news NCP leader Dhananjay Munde statement on Dharma Patil death

धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरून सरकारवर आगपाखड केली आहे. मुंडे म्हणाले, की जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश आता दिले, मग दोन वर्ष काय केले? मंत्रालयात येऊन जीव दिल्यानंतर ही इथे न्याय मिळत नाही आणि म्हणे आपले सरकार. मर्जीतल्या कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजलीची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही 'आपले सरकार' सारखी पोर्टलची नाटके बंद करून टाका. धर्मा पाटील यांच्या जमिनीची ज्यांनी भ्रष्ट्र हेतूने चुकीची परिगणणा केली आणि जिल्हा स्तर ते मंत्रालय धर्मा पाटील यांनी ज्यांच्या ज्यांच्याकडे न्याय मागितला आणि त्यांचे प्रकरण जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवले त्या सर्वांवर 302 चा गुन्हा दाखल करा. न्यायासाठी मंत्रालयात येऊन जीवनातील शेवटचा संघर्ष त्यांनी केला तरी सरकारला त्यांना न्याय द्यावा वाटला नाही. या मृत्यूस केवळ आणि केवळ सरकारच जबाबदार आहे.

मुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे : सुप्रिया सुळे
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे, अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com