बनावट नंबर प्लेटला बसणार चाप! 

सिद्धेश्‍वर डुकरे 
मंगळवार, 20 जून 2017

मुंबई - दुचाकी, चारचाकी तसेच अन्य कोणत्याही प्रकारच्या वाहनांच्या नंबर प्लेट यापुढे जीपीएस प्रणालीचा वापर असलेली उच्च प्रतीची सुरक्षा असलेली राहणार आहेत. या प्लेटमध्ये वाहनमालकाची सर्व माहिती राहणार असून, नंबर प्लेटमध्ये कोणतीही फसवणूक करता येणार नाही. यामुळे बनावट प्लेटला चाप बसणार आहे. 

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये सध्या फसवणूक करता येते. त्यामुळे बोगस नंबर प्लेटचे अनेक गुन्हे देशभरात समोर आले आहेत. तसेच वाहनचोरीच्या घटनांतही वाढ झाली असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांची चौकशी करताना पोलिसांच्या पुढे आव्हान निर्माण झालेले आहेत. तसेच वाहनांच्या नंबर प्लेट बनावट करून अवैध शस्त्रांचा वापर, खून, खंडणी वसुली, अपहरण आदी प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याला आळा बसण्यास मदत होणार आहे. 

नवीन वाहन खरेदी करताना शोरूममध्ये वाहने खरेदी केली जातात. त्यानंतर आरटीओ विभाग त्या वाहनास नंबर देते; मात्र नवीन पद्धतीमध्ये शोरूमध्ये ग्राहकाने वाहन खरेदी केले असताना आरटीओ विभागाशी त्याबाबत संपर्क साधला जाईल. त्यानंतर हाय सिक्‍युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वाहनासोबत जोडणी करून वाहनाचा ताबा ग्राहकाला देण्यात येणार आहे. जुन्या वाहनांमध्ये आरटीओ विभाग संपर्क साधून ही यंत्रणा बसवणार आहे. 

उच्च प्रतीच्या सुरक्षेची नोंदणी प्लेट 
ही नंबर प्लेट जीपीएस प्रणालीवर अधारित राहणार आहे. त्यामध्ये बदल, छेडछाड करता येणार नाही. तसे करण्याचा प्रयत्न केल्यास त्याबाबत त्वरित समजून येईल. तसेच या प्रणालीमुळे या वाहनांचे लोकेशन, वाहनांचा मालक याबाबत खरी माहिती लगेच मिळेल. त्यामुळे अनेक अवैध आणि गैरप्रकारांना आळा बसणार आहे. 

टॅग्स