नर्सिंग प्रवेशासाठी नीटची अट रद्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - विज्ञान शाखेतील पदवीच्या प्रथम वर्षासाठी नर्सिंगचा पर्याय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नीट परीक्षेची अट असणार नाही. वैद्यकीय शिक्षण आणि औषधद्रव्ये विभागाने हा निर्णय सोमवारी (ता. 16) जाहीर केला. 

नर्सिंगच्या जागा रिक्त राहत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. विज्ञान शाखेच्या पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी नीट बंधनकारक करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून नीट यूजी या सामाईक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच नर्सिंग निवडणे बंधनकारक करण्यात आले होते; परंतु या नियमामुळे खासगी विनाअनुदानित संस्थांच्या असंख्य जागा रिक्त राहिल्या. या संस्थांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला.