पेट्रोल दोन, तर डिझेल एक रुपयाने स्वस्त

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

मुंबई, - केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यानंतर राज्य सरकारने पेट्रोल दोन तर डिझेल एक रुपयाने कमी केल्याची आज घोषणा केली. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्री बारापासून राज्यातील इंधनाचे दर कमी होणार असल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी केला आहे. पेट्रोल २, तर डिझेल १ रुपयाने स्वस्त होणार आहे. मध्यरात्रीपासून नवे दर लागू झाले आहेत. या निर्णयामुळे २ हजार १५ कोटींचे नुकसान होणार आहे. पेट्रोलचे दर कमी केल्याने ९४० कोटी, तर डिझेलचे दर कमी केल्याने १ हजार ७५ कोटींचा बोजा राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. जवळपास ३ हजार ६७ कोटींची घट अपेक्षित आहे. मात्र राज्य सरकार काटकसरीतून घट भरून काढणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीमुळे सरकारला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. त्यानंतर केंद्र सरकारने उत्पादन शुल्क २ रुपयांनी कमी केले आणि राज्यांनाही व्हॅट कमी करण्याचे आवाहन केले होते. केंद्र सरकारच्या या आवाहनाला आतापर्यंत गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने प्रतिसाद दिला आहे. गुजरात सरकारने ४ टक्के व्हॅट कमी केल्याने पेट्रोल २.९३ रुपये, तर डिझेल २.७२ रुपयांनी स्वस्त झाले आहे.

गुजरातनेही पेट्रोलवरील व्हॅट घटविला 
गांधीनगर : महाराष्ट्र सरकार पाठोपाठ गुजरात सरकारनेही पेट्रोल व डिझेलवरील व्हॅट चार टक्‍क्‍यांनी घटविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गुजरात सरकारचा कर कपातीचा निर्णय हा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेण्यात आला असल्याची टीका काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.