पोलिस भरतीतील गुन्हा उंचीमुळे उघड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - पोलिस भरतीत डमी उमेदवार उभा करून नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या 27 वर्षांच्या तरुणाचे बिंग उंचीमुळे फुटले. हा प्रकार नुकताच पंतनगर पोलिसांनी उघडकीस आणला. भाऊसाहेब बरडकर (वय 27) असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीत भाऊसाहेब बरडकर याने छाती व उंची मोजताना आणि मैदानी परीक्षेसाठी मित्राला पाठवले होते. यात उत्तीर्ण झाल्यानंतर रेल्वे पोलिस निवडण्यात आलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करत होते. त्या वेळी बरडकरच्या कागदपत्रांवर लावण्यात आलेले छायाचित्र त्याच्याशी जुळत नव्हते. त्या वेळी बरडकरने आपण वजन कमी केल्याची थाप मारली. खात्री करण्यासाठी त्याला अनेकदा तारीख देऊन बोलावण्यात आले; मात्र वेगवेगळी कारणे देऊन तो येणे टाळत होता. व्हिडिओ चित्रीकरण तपासल्यावर बरडकरने केलेला गुन्हा उघडकीस आला. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. 

महाराष्ट्र

पुणे - कोकणसह मध्य महाराष्ट्रात सोमवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचेही हवामान विभागाच्या...

06.27 AM

नाशिक  - निरक्षरतेचा गैरफायदा घेत आंबेगावच्या (ता. पेठ) पोस्टमास्टरने चुकीच्या नोंदी करत नागरिकांच्या पैशांवर डल्ला...

05.48 AM

मुंबई - भाजपला सोडचिठ्ठी देण्याची मागणी केल्यानंतर आज शिवसेनेचे चार मंत्री मंत्रालयात उपस्थित होते, तर आमदारही मंत्रालयात...

05.03 AM