सरकारने केली पोलिसांची ‘किंमत’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 सप्टेंबर 2017

मुंबई - ऑगस्ट महिन्यात आलेले गणेशोत्सव, बकरी ईददरम्यान अनुचित घटना टाळण्यासाठी डोळ्यांत तेल घालून रात्रं-दिवस जागता पहारा देणाऱ्या पोलिसांसाठी राज्य सरकारने ‘दिलदारपणा’ दाखवत पाच कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदापर्यंतच्या पोलिस कर्मचाऱ्यांना हे बक्षीस दिले जाणार आहे. तसा सरकारी निर्णयही जारी झाला आहे. या कर्मचाऱ्यांची संख्या दीड लाखाच्या घरात आहे. ते पाहता, प्रत्येक कर्मचाऱ्याच्या हातात केवळ ३३५ ते ४०० रुपयेच टेकवून पोलिसांचे कौतुक केले जाणार आहे. त्यामुळे हे बक्षीस जाहीर करून सरकारने आमची ‘किंमत’ केली का, असा प्रश्‍न पोलिसांना पडला आहे.

२५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत पोलिसांनी केलेल्या कामगिरीचा विचार करून हे बक्षीस जाहीर करण्यात आले.  राज्यातील सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसाठी या बक्षिसाचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.