"एमआरयूसी'च्या उपाध्यक्षपदी प्रतापराव पवार यांची निवड 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - माध्यम सर्वेक्षणात अग्रेसर असलेल्या "मीडिया रिसर्च यूझर्स काउन्सिल' (एमआरयूसी) या संस्थेच्या उपाध्यक्षपदी "सकाळ'चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची निवड करण्यात आली आहे. 

"साउथ एशिया डेन्स्‌ू एजीस नेटवर्क'चे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भसीन यांची संस्थेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. ही निवड 2017-18 या वर्षासाठी आहे. 

मुंबईत बुधवारी झालेल्या "एमआरयूसी'च्या सभेत पवार यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. पवार या आधी "एमआरयूसी'च्या संचालक मंडळात प्रकाशकांचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. "एमआरयूसी' गेल्या दोन दशकांपासून माध्यम क्षेत्रातील विविध पैलूंवर शास्त्रशुद्ध सर्वेक्षण करत आहे. इंडियन रीडरशिप सर्व्हे (आयआरएस) हे भारतातल्या वृत्तपत्र वाचकांचे सर्वांत मोठे आणि सर्वांत विश्‍वासार्ह सर्वेक्षण "एमआरयूसी'च्या वतीने केले जाते. 

वृत्तपत्रांचे वाचक तसेच अन्य माध्यमांचे वापरकर्ते, त्यांचे आर्थिक गट, बदलत्या अपेक्षा, सवयी, बदलते तंत्रज्ञान यांबद्दल सातत्याने सर्वेक्षण करून प्रकाशक, तसेच जाहिरातदारांना योग्य माहिती "एमआरयूसी'कडून मिळत असते. माध्यम क्षेत्रातील बदलांचा वेळीच अंदाज घेऊन भविष्यकालीन धोरणांचा विचार करण्यासाठी "एमआरयूसी'च्या सदस्यांना या सर्वेक्षणांचा; तसेच वेळोवेळी करण्यात येत असलेल्या अभ्यासांचा फायदा होतो.