पुणे जिल्हा बॅंकेच्या जुन्या नोटांचा स्वीकार 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकांकडील पडून असलेल्या नोटा स्वीकारल्या नाहीत. मात्र, विरोधी पक्ष आणि राज्य सरकार यांनी पाठपुरावा केल्यानंतर अलीकडेच देशातील सहकारी बॅंकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्याचे "आरबीआय'ने कबूल केले. या निर्णयामुळे पुणे सहकरी बॅंकेकडील सुमारे 551 कोटी रुपये मूल्याच्या नोटा "आरबीआय'ने स्वीकारल्या आहेत. त्याबदल्यात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेला 551 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातील इतर सहकारी बॅंकांकडील नोटाही "आरबीआय'ने स्वीकारल्या आहेत. त्या बॅंकांनाही निधी मिळणे सुरू आहे.

मुंबई - केंद्र सरकारने नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने सहकारी बॅंकांकडील पडून असलेल्या नोटा स्वीकारल्या नाहीत. मात्र, विरोधी पक्ष आणि राज्य सरकार यांनी पाठपुरावा केल्यानंतर अलीकडेच देशातील सहकारी बॅंकांकडील जुन्या नोटा स्वीकारण्याचे "आरबीआय'ने कबूल केले. या निर्णयामुळे पुणे सहकरी बॅंकेकडील सुमारे 551 कोटी रुपये मूल्याच्या नोटा "आरबीआय'ने स्वीकारल्या आहेत. त्याबदल्यात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेला 551 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्यातील इतर सहकारी बॅंकांकडील नोटाही "आरबीआय'ने स्वीकारल्या आहेत. त्या बॅंकांनाही निधी मिळणे सुरू आहे. सहकारी बॅंकांकडे 2700 कोटी रुपये मूल्याच्या नोटा पडून होत्या. तितका निधी "आरबीआय'कडून या बॅंकांना मिळणार आहे. 

नाशिक जिल्हा सहकारी बॅंकेचा जुन्या नोटांचा सुमारे 23 कोटी नोटांचा हिशेबाचा ताळमेळ बसत नाही. याबाबत बॅंकेने कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी सुरू केली आहे. 23 कोटी रुपये मूल्य असलेल्या नोटांची नोंद आहे मात्र नोटा नाहीत, अशी स्थिती समोर आली आहे. 

व्याजासाठी दाद मागणार - अजित पवार 
रिझर्व्ह बॅंकेने जुन्या चलनाच्या नोटा स्वीकारण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लावला. या कालावधीत सहकारी बॅंकांकडील निधीवर व्याज नाही. तसेच याबाबत कुठलीही भूमिका "आरबीआय'ने स्पष्ट केली नाही. या रकमाच्या व्याजापोटी न्यायालयात दाद मागणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.