पीडब्लूडी गैरव्यवहारप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा 

पीडब्लूडी गैरव्यवहारप्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करा 

मुंबई - सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तीन लाखांच्या आतील कामे दाखवून राज्याचा कारभार जेथून चालतो त्या मंत्रालयातच नाकावर टिच्चून भ्रष्टाचार करत आहेत. मंत्रालयाच्या परिसरात "एस' आकाराच्या स्टाइल्सचे काम न करताच 24 लाखांची बिले उचलली असल्याचा प्रकार गंभीर असून, या प्रकाराची तातडीने चौकशी करावी व संबधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

"सकाळ' मध्ये (ता. 16) याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. याची दखल घेत विभागाने संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू केली असून, भरारी पथकालाही तपास करण्यास सांगितले आहे. 

दरम्यान, स्वातंत्र्य दिनाच्या नावाखाली अशा प्रकारचे बोगस काम करून लाखो रुपयांचा निधी हडपणे ही गंभीर बाब असल्याचे मुंडे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशाला डावलून त्यांच्याच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री ई टेंडरिंगला बगल देत तीन लाखांच्या आतील कामे काढून राजरोसपणे भ्रष्टाचार करत असल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे. वरिष्ठांच्या मान्यतेशिवाय अशा प्रकारची कामे होऊच शकत नसल्याचा दावा करत, सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व प्रकरणांची सखोल चौकशी करा, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com