रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीत उभारणार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जुलै 2017

मुंबई  - बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे "अजातशत्रू' या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मंगळवारी करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, नागपूर येथील दीक्षाभूमीवर डॉ. आंबेडकरांचे स्मारक उभारण्याचे श्रेय गवई यांना जाते. लोकसंग्रह ही त्यांची संपत्ती होती. या संपत्तीचा संग्रह पुस्तकरूपाने आपल्या हाती आला आहे. राजकारणात काम करणाऱ्या प्रत्येकाने हा ग्रंथ संग्रही ठेवायला हवा. 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, बिहारचे राज्यपाल असताना गवई यांनी उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी उत्तम कार्य केले. ते अत्यंत नम्र, शालीन, सुसंस्कृत, परिपक्व आणि आंबेडकर चळवळीशी प्रामाणिक नेते होते. 30 वर्षांच्या कालावधीत त्यांनी विधिमंडळात आपल्या कामाची चुणूक दाखवली. त्यांची भाषणे अभ्यासपूर्ण असत. 

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले की, गवई यांचे माझ्याशी खूप जवळचे नाते होते. त्यांनी राजकारण आणि समाजकारणातील नेत्यांना एकत्र आणले. त्यांनी दलित समाजासाठी खूप काम केले. त्यांचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे. 

गवई यांनी काम केलेल्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गवई यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या.