मोपलवारांची चौकशी सुरू 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

मुंबई -  समृद्धी महामार्ग कथित गैरव्यवहारप्रकरणी सक्तीच्या रजेवर पाठवलेले "एमएसआरडीए'चे उपाध्यक्ष राधेश्‍याम मोपलवार यांच्या चौकशीची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. चौकशीसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन जणांची समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये "इकॉनॉमिक विंग'चे उपायुक्त प्रवीण पडवळ व पोलिस अधिकारी आशुतोष डंबरे यांचाही समावेश आहे. 

समृद्धी महामार्गाच्या जमीनसंपादनाच्या कार्यवाहीत मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप मोपलवार यांच्यावर आहे. यासंबधीचे एका शेतकऱ्यासोबतचे त्यांचे वादग्रस्त संभाषणही समोर आले आहे. विधिमंडळात विरोधकांनी या प्रकरणी मोपलवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर "एसआयटी'मार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. "एसआयटी'ची आज स्थापना करण्यात आली असून एक महिन्यांत संपूर्ण प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. 

महाराष्ट्र

पाच लाखांची गरज; मदतीसाठी पुढे येण्याचे दानशूरांना आवाहन औरंगाबाद - महाविद्यालयात शिकत असताना महाविद्यालयीन विविध उपक्रमांत...

03.54 PM

पुणे - ‘सकाळ इन्व्हेस्टिगेशन टीम’चे (एसआयटी) वरिष्ठ बातमीदार गोविंद तुपे यांना; तसेच ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे बातमीदार...

06.33 AM

मुंबई -शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारला नव्याने कर्ज घ्यावे लागणार असून, 20 हजार कोटींच्या कर्जासाठी केंद्र सरकारने राज्य...

04.48 AM