राज्याच्या अनेक भागांत संततधार; शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

Rain monsoon
Rain monsoon

राज्यभरात ठिकठिकाणी काल (गुरुवार) रात्रीपासून संततधार पाऊस सुरू असल्याने अनेक दिवसांपासून वरुणराजाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. राज्यभरातील वेगवेगळ्या ठिकाणच्या पावसाचा थोडक्यात घोषवारा...

पुणे : मागील वर्षीच्या तुलनेत धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणांतील पाणीसाठा 47.14 टक्के होता. यंदा केवळ 30.82 टक्के साठा आहे. टेमघर धरणात 93 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 
पुणे शहर आणि परिसरात संततधार पावसामुळे मुळा नदीच्या पाणीपातळीत थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यावर अनेक दिवसांपासून साचलेला जलपर्णीचा थर वाहून जात आहे. यामुळे नदीचा प्रवाह प्रसन्न दिसत आहे. संगमवाडी पुलावरून टिपलेले हे दृश्य. (व्हिडिओ - मोहन पाटील)

अकोला : जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पर्जन्यमान (मिलिमीटरमध्ये) : बाळापूर- 02, वाडेगाव- 05, पारस- 00, निंबा- 02. उरळ- 05, व्याळा- 00, हातरूण- 00 मिमी. बाळापूर तालुक्यात एकूण 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सरासरी पाऊस 2 मिलिमीटर एवढा झाला आहे.

नांदेड : कामारी (ता. हिमायतनगर) येथे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी मुस्लिम बांधवांची प्रार्थना, अन्नदान करण्यात आले. यावेळी गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद.

नाशिक : रात्रभर संततधार पावसाने गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तसेच, इगतपुरीमध्ये आज 193 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली. एकूण पाऊस 1484 मिलिमीटर एवढा झाला. ही टक्केवारी 43.11% इतकी आहे. 
दरम्यान, सिन्नर घोटी दारणावरील पूल तुटल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार अनिल पुरे, माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे आदींनी सिन्नर घोटी दारणावरील तुटलेल्या पुलाची पाहणी केली. त्र्यंबकेश्वर परिसरात सततच्या पावसाने गोदावरीला पूर आला आहे. पुराचे पाणी गावात शिरले. किरकोळ नुकसान झाले.

कोकण : साडवली- देवरुखसह संगमेश्वर तालुक्यात जवळपास ८ तास सलग दमदार पाऊस पडल्याने शेतकरी बांधवांना थोडा दिलासा मिळाला आहे. भात लावणी पूर्ण झालेल्या परिसरातून चार दिवस पाऊस गायब होता. कडकडीत ऊन पडल्याने काही भागात भात पीक हातचे जाणार की काय अशी परिस्थिती होती. मात्र, गुरुवारी रात्रीपासून पहाटेपर्यंत दमदार पावसाने शेतकर्‍यांना सहाय्य केले आहे. शुक्रवारीही चांगला पाऊस पडेल असे तालुक्यात वातावरण आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारीवडे माळकरवाडी येथे कपडे धुत असताना अचानक पूर आल्याने महिला गेली वाहून पोलिस आणि ग्रामस्थ घेताहेत बेपत्ता महिलेचा शोध.

गोवा : केपे तालुक्यातील पारोडा येथे पूर आल्याने येथील पूल पाण्याखाली गेला. केपे मडगाव वाहतूक चांदर मार्गे वळवली.

काही ठिकाणी पावसामुळे किरकोळ नुकसानीच्या घटनाही समोर आल्या आहेत, मात्र एकंदर जनजीवन सुरळीत चालू असल्याचे दिसून आले. नाशिकमध्ये गोदावरीला पूर आल्याने पुराचे पाणी गावात शिरून किरकोळ नुकसान झाले. तर ठाण्यात एक मोठे झाड कोसळून दोन चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले. विजा पडल्यामुळे कुठेही नुकसान झालेले नाही.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com