कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात अतिवृष्टी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

पुणे - मध्य महाराष्ट्रातील काही भागांत हवेचे दाब कमी झाले आहेत, त्यामुळे गुरुवारी (ता. १४) सकाळी आठ वाजेपर्यंत कोल्हापुरातील दहा मंडलांत अतिवृष्टी झाल्यामुळे ओढे, नाले भरून वाहिल्याने घरांत पाणी घुसले. पुणे जिल्ह्यातील तीन, तर मराठवाड्यातील बदनापूर व परांडा आणि विदर्भातील गडचिरोलीतील पुरंदा येथे अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

येत्या सोमवारी (ता. १८) कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (शुक्रवारी) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचे संकेत आहेत. मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी, कोकण, गोवा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला. 

Web Title: maharashtra news rain kolhapur pune