समाधी यात्रेत रंगले काल्याचे कीर्तन

समाधी यात्रेत रंगले काल्याचे कीर्तन

सासवड - संत सोपानदेव महाराजांच्या संजीवन समाधी उत्सव सोहळ्यात शुक्रवारी (ता. १५) समाधी वर्णनाचे कीर्तन, काल्याचे कीर्तन आणि दिंडी प्रदक्षिणा रंगली. समाधी वर्णनाच्या कीर्तनात संत नामदेवांचे वंशज केशव महाराज नामदास यांनी तुडुंब भरलेल्या देऊळवाड्यात उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी उभे केले. 

सासवड (ता. पुरंदर) येथील समाधी मंदिरात संत सोपानदेवांचा समाधी दिन सोहळा सुरू आहे. सोहळ्यातील ‘पवमान’च्या दिवशी पहाटे पवमान अभिषेक झाल्यापासूनच सुरू झालेली गर्दी आजही कायम होती. मंदिरात व देऊळवाडा परिसरात मोठ्या दर्शनरांगा होत्या. समाधी मंदिराच्या वीणामंडपात समाधी उत्सव सोहळ्यानिमित्त केशवमहाराज नामदास (पंढरपूर) यांचे समाधी वर्णनाचे कीर्तन भक्तिरंगात रंगले. त्यापाठोपाठ कोकाटे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होताना दहीहंडी व टाळ-मृदंगाच्या गजरात व जयघोषात दिंडी प्रदक्षिणा झाली. आळंदीच्या संत ज्ञानेश्‍वर संस्थानचे मुख्य विश्‍वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्‍वस्त अभय टिळक, राजाभाऊ चोपदार, सोपानदेव ट्रस्टचे विश्‍वस्त ॲड. गोपाळ गोसावी, श्रीकांत गोसावी उपस्थित होते.  सत्यवती एदलाबादकर यांचे प्रवचन झाले. उद्या समाधी दिन यात्रेचा शेवटचा दिवस (ता. १६) आहे. त्यानिमित्त प्रक्षाळ पूजनाने व सांगतेच्या कीर्तन, प्रवचन सेवेने यात्रेची सांगता होईल, असे विश्‍वस्त गोसावी बंधूंनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com