शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बॅंक खाते सक्तीचे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

सोलापूर - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा बॅंक खाते क्रमांक व आधार क्रमांक त्या अर्जावर नमूद करावा लागणार आहे. त्याचबरोबर शिक्षकांचे पगार होणाऱ्या बॅंकेमध्येच विद्यार्थ्यांची खाती उघडण्याचे आदेश परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिले आहेत. 

शिक्षकांचे पगार ज्या बॅंकेमधून होतात, त्याच बॅंकेमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांची खाती उघडायची आहेत. ही खाते शून्य शिलकीची उघडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. त्याचबरोबर खाते उघडताना संबंधित विद्यार्थ्यांचा आधार क्रमांकही त्या खात्याला जोडणे बंधनकारक केले आहे. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ज्या वेळी ऑनलाइन अर्ज भरले जातील, त्या वेळी त्या अर्जावर बॅंक खाते व आधार क्रमांक नोंदविणे सक्तीचे करण्यात आले आहे.