शिर्डी विमानतळाला श्री साईबाबांचे नाव 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

मुंबई - शिर्डी येथील "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' या विमानतळाचे श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याची शिफारस केंद्र सरकारकडे करण्यास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

श्री साईबाबा यांच्या समाधीचे शताब्दी पर्व ऑक्‍टोबरपासून सुरू होणार आहे. त्या दृष्टीने येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता हे विमानतळ लवकरच सुरू करण्याचे नियोजन आहे. या विमानतळाच्या नामकरणाचा ठराव श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी करून महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे पाठवला. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यास मंजुरी दिली आहे. विमानतळाच्या नावात बदल करण्याची बाब केंद्राच्या अखत्यारीत येते. नागपूर येथील येत्या हिवाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहांची मान्यता मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या शिफारशीसह हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे. 

शिर्डी (जि. नगर) येथे श्री साईबाबा समाधी दर्शनासाठी देश-विदेशातून दररोज हजारो भाविक येतात. भाविकांची संख्या लक्षात घेता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने "शिर्डी ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल एअरपोर्ट' हे विमानतळ उभारले आहे. श्री साईबाबा संस्थानने या विमानतळाच्या उभारणीसाठी दिलेल्या निधीतून धावपट्टी, टॅक्‍सी वे, टर्मिनल इमारत, पायाभूत सुविधा, संरक्षक भिंत इत्यादी कामे करण्यात आली आहेत. 

Web Title: maharashtra news shirdi airport sai baba