दसऱ्यापूर्वी कर्जमाफी देण्याची शिवसेना मंत्र्यांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारने कर्जमाफी जाहीर करूनही शेतकऱ्यांना खरीप हंगामात कर्ज मिळाले नाही. किमान येत्या रब्बी हंगामात तरी शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावे यासाठी दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज मंत्रालयात भेटून केली. या वेळी शिष्टमंडळात मंत्री दिवाकर रावते, सुभाष देसाई, रामदास कदम, एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे आणि गुलाबराव पाटील आदी सहभागी झाले होते. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. सरकारने 28 जून रोजी ही घोषणा केली. राज्य सरकारकडून केवळ आकड्यांचे खेळ आणि तारखांवर तारखा देणे सुरू आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना दसऱ्याआधी कर्जमुक्त करा, या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले. तसेच मुंबईत शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. दरम्यान, अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर अर्जांच्या छाननीसाठी पंधरा दिवस लागतील. त्यानंतर दसरा ते दिवाळीपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे वर्ग केले जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याचे सांगण्यात आले.