कर्जमाफीसाठी समितीत शिवसेनाही असेल: मुनगंटीवार

कपालिनी सिनकर
बुधवार, 7 जून 2017

शिवसेनेने मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी गैरहजर राहण्याची अनुमती मागितली, महत्त्वाचे विषय नसल्याने मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. उद्धव ठाकरेजी परदेशात असल्याने त्यांना त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. त्यांना निर्णय घेता आला नाही म्हणून ते अनुपस्थित राहिले.

मुंबई - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती असेल असे सांगितले आहे. या समितीत शेतकरी संघटना, सर्व पक्ष आणि शिवसेनाही असेल, असे स्पष्टीकरण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.

आम्ही कॅबिनेट बैठकीत जाणार नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. शेतकरयांना अंधारात ठेऊन निर्णय घेऊ नये, असे शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी सांगितले होते. त्यानंतर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शेतकरी कर्जमाफीवरून आक्रमक झालेल्या शिवसेनेने आज (बुधवार) होणाऱ्या मंत्रीमंडळ बैठकीवर थेट बहिष्कार घातला.

मुनगंटीवार म्हणाले, की शिवसेनेने मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकलेला नाही. त्यांनी गैरहजर राहण्याची अनुमती मागितली, महत्त्वाचे विषय नसल्याने मुख्यमंत्र्यांनी अनुमती दिली. उद्धव ठाकरेजी परदेशात असल्याने त्यांना त्यांच्याशी चर्चा करता आली नाही. त्यांना निर्णय घेता आला नाही म्हणून ते अनुपस्थित राहिले. कुणी कुणावर दमदाटी करू नये. सेनेवर केलेली नाही आणि कुणी भाजपवरही करू नये. तसेच दम कुणी सहन करू नये, भाजप ने दम दिलेला नाही. कॅबिनेटची चर्चा मीडियात होणार नाही. कॅबिनेट गिरगांव चौपाटीला होणार नाही मंत्रालयातच होणार ना..? शिवसेना डोकेदुखी वाटतेय असे मला सध्या वाटतं नाही. कर्जमुक्तीचा निर्णय झाला आहे, आता फाटे फोडण्यापेक्षा यावर काम करू.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
शिवसेना आक्रमक; मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे: सुभाष देसाई
संप मिटवायचा आहे की नाही?: संजय राऊत
पाकिस्तान होणार चीनचा लष्करी तळ; 'पेंटॅगॉन'चा अहवाल​
हिज्बुलचा दहशतवादी दानिश अहमदचे आत्मसमर्पण
'यूपीआय' व्यवहारांवर भरावे लागणार शुल्क
शेतकऱ्यांकडून मंदसोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मारहाण​
लातूर: मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून
अकोला, बुलडाणा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?​
नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार​
लंडनवासीयांनी लुटला सांस्कृतिक कार्यक्रमांचा 'आस्वाद'​