सुप्रिया सुळे यांची "युवा संवाद यात्रा' 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसला युवावर्गाची संजीवनी मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे राज्यभरात "युवा संवाद यात्रा' काढणार आहेत. पुढील चार महिन्यांत राज्यातील शंभर महाविद्यालयांतील युवक व युवतींशी त्या संवाद साधणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 2011पासून राज्यभर "जागर हा जाणिवां'चा ही मोहीम राबविली जाते. त्याचाच हा भाग असून, यंदा स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, व्यसनाधिनता व मुलींवरील अत्याचार या विषयांना घेऊन सुळे राज्यातील युवकांसोबत संवादाची मोहीम छेडणार आहेत. 

येत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान ही यात्रा सुरू होणार आहे. तर पुढील तीन महिन्यांत त्या शंभर महाविद्यालयांत "युवा संवाद' कार्यक्रम राबवणार आहेत. 

आतापर्यंत "उमेद'च्या माध्यमातून 400 विधवा महिलांना स्वयंरोजगार देण्यात आला आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना आधार देण्यात येणार आहे. तसेच मुलींनी आत्महत्या करू नये, यासाठीचे या मोहिमेच्या माध्यमातून जनजागरणही करण्यात येणार आहे.

Web Title: maharashtra news supriya sule ncp