मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

पुणे - कोकण, मराठवाडा व विदर्भात काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारला नैर्ऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र वगळता विदर्भ, कोकणात येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 18) मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागांतही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

पुणे - कोकण, मराठवाडा व विदर्भात काही भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. यामुळे राज्यात गेल्या काही दिवसांपासून दडी मारला नैर्ऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) पुन्हा सक्रिय होण्याची शक्‍यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र वगळता विदर्भ, कोकणात येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 18) मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. अरबी समुद्र ते महाराष्ट्राच्या दक्षिण भागात सध्या चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. हा पट्टा अरबी समुद्राकडून महाराष्ट्राच्या उत्तर भागाकडे सरकत आहे. तसेच मराठवाड्याच्या काही भागांतही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे या भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडत आहे. 

कोकणात ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड येथे मध्यम पाऊस पडला. तर उर्वरित भागातही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तसेच घाटमाथ्यावरही मध्यम ते जोरदार पाऊस पडला. काही ठिकाणी ढगाळ हवामान होते. मध्य महाराष्ट्रातील लोणावळा, इगतपुरी, पेठ, हरसूल, त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हलका पाऊस पडला. उर्वरित अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण, तर काही वेळेस ऊन पडत होते. यातील उदगीर, अर्धापूर, किनवट येथेही पावसाने हजेरी लावली. माहूर, रेणापूर, चाकूर, देगलूर, हिमायतनगर या ठिकाणीही हलक्‍या सरी पडल्या. यातील बहुतांशी ठिकाणी ढगाळ, तर काही ठिकाणी ऊन पडल्याचे चित्र होते. त्यामुळे हवामानात दमटपणा वाढला असून कमाल तापमानातही वाढ झाली. तसेच विदर्भातील दिग्रस, अहिरी, अरणी, जोईती व महागाव येथेही हलक्‍या सरी कोसळल्या. 

कोकणातील काही ठिकाणी हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात ढगाळ हवामान होते. पुणे परिसरातही ढगाळ हवामान होते.