महाराष्ट्रातील 12 अधिकारी झाले IAS

ias
ias

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या सेवेत कार्यरत असलेल्या 12 अधिकाऱ्यांची 'भारतीय प्रशासकीय सेवे'त (आयएएस) पदोन्नती झाली आहे. केंद्र सरकारच्या 'पर्सोनल ऍण्ड ट्रेनिंग' विभागाने नुकताच आदेश जारी करून या नियुक्‍त्या जाहीर केल्या आहेत.

व्ही. व्ही. माने, एम. एम. सुर्यवंशी, आर. एच. ठाकरे, जे. एस. पापळकर, एस. डी. मांढरे, एस. जी. कोल्हे, आर. डी. निवतकर, ए.के. ढाकणे, ए. ए. गुल्हाणे, के. व्ही. जाधव, जी. एम. बोडके, सी. के. डांगे अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत ठराविक वर्षे नोकरी केलेल्या व उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकाऱ्यांना आयएएस पदावर पदोन्नती दिली जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या सेवेतील पात्र अधिकाऱ्यांच्या आयएएस पदोन्नतींना कमालीचा विलंब झाला आहे. दोन ते चार वर्षे विलंबाने बहुतांश अधिकाऱ्यांच्या पदोन्नती होत आहेत. त्यामुळे अशा पात्र अधिकारी वर्गामध्ये कमालीची नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील 12 अधिकाऱयांची पदोन्नती झाली आहे.

पदोन्नती झाल्याने या अधिकाऱ्यांची आता राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सहआयुक्त, आयुक्त अशा आयएएस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या पदांवर नियुक्ती होईल, असे सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com