एकनाथ शिंदे बंड : दबावतंत्रासाठी शिवसेनेचं 'पवार' कार्ड

अडीच वर्षांपूर्वी राज्यात मविआ स्थापन करण्यात पवारांची भूमिका मोलाची होती.
Sharad Pawar
Sharad PawarSakal

मुंबई : विधान परिषदेच्या निकालानंतर राज्यात सुरु असलेले सत्तांतराचे वादळ अजून काही दिवस तरी शांत होणार नसल्याचे दिसून येते आहे. सुरुवातीच्या नाट्यमय घडामोडींनंतर आता मविआ टिकवण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकांमध्ये सक्रीय सहभाग घेतल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठका असोत किंवा पवार ठाकरे यांच्यात पार पडलेल्या बैठका असोत यामध्ये पवारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, बंडवीर एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झालेल्या आमदारांना परत आणण्यासाठी आणि त्यांच्यावर दबाव निर्माण व्हावा यासाठी शिवसेनेने पवार कार्ड खेळल्याची चर्चा सुरूये. शिवसेना नेते संजय राऊत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानामुळे या चर्चेला बळ मिळालंय. ''अडीच वर्षांपूर्वी राज्यात मविआ स्थापन करण्यात पवारांची भूमिका मोलाची होती. त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीत सरकार वाचवण्यासाठी पवारांनी यामध्ये हस्तक्षेप केला तर गैर काय, असं राऊतांनी म्हटलंय.

पवार कार्ड का?

शरद पवार हे मुरलेले राजकारणी आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग हे पवारांमुळे यशस्वी झाला. पवार सध्या देशपातळीवर विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. पवारांसारखा पॉवरफूल नेता सक्रीय झाल्यास बंडखोरांवर मानसिक दबाव निर्माण होईल आणि शिंदेगटाला फोडणे सोपं होईल, असा शिवसेनेचा प्लान असावा.

सध्याच्या परिस्थितीवर काय म्हणाले पवार

दरम्यान, राज्यात कोणत्याही अडचणींशिवाय अडीच वर्षांपासून सरकार चालत असल्याने हे षडयंत्र रचण्यात आले आहे, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले होते. एवढेच नव्हे तर, महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा निर्णय झाल्यानंतरही अशा प्रकारची बंडाळी झाली होती असेही त्यांनी सांगितले. तर, एकनाथ शिंदे यांचे बंड हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा असून, आम्ही मविआ म्हणून एकत्र आहोत त्यामुळे सरकार वाचवण्याची जबाबदारी तिनही पक्षांची असल्याचे पवार म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com