महाराष्ट्रातील सर्व पर्यटक उत्तराखंडमध्ये सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

मुंबई - उत्तराखंड राज्यातील विष्णू प्रयागला झालेल्या भूस्खलनामुळे चारधाम यात्रेला गेलेले राज्यातील 179 यात्रेकरू अडकले आहेत. तेथे कोणतीही जीवित व वित्तहानी झालेली नाही. राज्य शासन स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, सर्व यात्रेकरू सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

या यात्रेकरूंमध्ये औरंगाबाद (102), पुणे (38), सांगली (33), जळगाव (6) येथील यात्रेकरूंचा समावेश असून, सर्व यात्रेकरू सुखरूप आहेत. उत्तराखंडच्या चार्मोली जिल्हाधिकारी यांच्याशी यासंबंधी बोलणे झाले आहे. चारधामचा रस्ता दुपारी 3 वाजता चालू होणार आहे. त्यानंतर अडकलेल्या यात्रेकरूंना रेल्वे स्टेशनला आणून त्या ठिकाणाहून रेल्वेने त्यांना राज्यात परत आणले जाणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

चारधाम भाविकांसाठी उत्तराखंड सरकारने जारी केलेले पर्यटक हेल्पलाइन क्रमांक
0135-2559898 ,2552626, 2552627,2552628 आणि 1364