कृषिपंपधारकांना दिलासा?; हाय होल्टेजसाठी महावितरणाच्या निविदा

विजय गायकवाड
बुधवार, 30 मे 2018

मुंबई : खंडीत वीजपुरवठ्याने हैराण झालेल्या कृषिपंपधारकांना महावितरणकडून दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. वीज जोडणीची मागणी केलेल्या 2 लाख 25 हजार पंपधारक आणि लघुदाब वाहिनीवरील 40 लाख 68 हजार पंपांना हाय व्होल्टेज (उच्च दाब) वीजजोडणी देण्यात येणार आहे. 

महावितरणने उच्च दाब वितरण प्रणाली योजनेसाठी (एचव्हीडीएस) निविदा जारी केल्या आहेत. नव्या योजनेत एका डीपीवर यापुढे दोन कृषिपंप असणार आहेत. त्यामुळे वीज ट्रिपच्या कटकटीपासून शेतकऱ्यांना कायमची मुक्ती मिळणार आहे. 

राज्यातील 40 लाख 68 हजार 220 पंपधारक आणि 2 लाख 24 हजार 785 शेतकऱ्यांना वीज जोडीसाठी पैसे भरुनही वीजजोड देण्यात आलेली नाही. या प्रलंबित शेतकऱ्यांना महावितरणच्या हाय व्होल्टेज वीजजोडणीत प्राधान्याने सहभागी करुन घेतले जाणार असल्याची माहीती उर्जा विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. राज्य सरकारने यासाठी 5 हजार 48.13 कोटीच्या प्रकल्प खर्चाला मंजूरी दिली असून विदर्भ-मराठवाड्यातील पेडपेंडीसाठी 1954.09 कोटी अनुदान मिळणार आहे. उर्वरीत महाराष्ट्रासाठी 2हजार 542.59 कोटी इतका निधी महावितरण कर्ज उभारुन उपलब्ध करुन देणार आहे. 

एका डिपीवर दोनच कृषिपंप 
आधीच्या वीजजोडणीत कृषिपंपांना 63 ते 100 केव्हीएचा वीज जोड दिला जातो. एकाच डीपीवर अनेक कृषिपंप जोडल्यामुळे लोड येऊन वीजपुरवठा खंडित होतो. मात्र नव्या योजनेत या कटकटीपासून संपूर्ण मुक्ती मिळणार आहे. एका डीपीवर दोनच कृषिपंपामुळे ताण आपोआप कमी होण्याची अपेक्षा आहे. 

"लघुदाब वीजपुरवठ्यात अडचणी येतात. अखंडीत वीजपुरवठ्यासाठी उर्जा विभागाने एचव्हीडीसी स्वीकार केला आहे. यातील प्रशासकीय आणि आर्थिक बाबी पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच सर्व प्रलंबित कृषी वीज पंपधारकांना स्वतःची डीपी (रोहीत्र)आणि अखंडीत वीजपुरवठा मिळेल." 
- चंद्रशेखर बावनकुळे, उर्जामंत्री

Web Title: mahavitran relief to farmers