राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने 24 ते 26 सप्टेंबर या कालावधीत घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्याच्या मुलाखती 16 जानेवारीपासून सुरू होणार आहेत. अन्नसुरक्षा अधिकारी परीक्षेचा निकालही आयोगाने जाहीर केला आहे. 

लेखी परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी अधिसूचित पदांसाठी पसंतीक्रम त्यांच्या प्रोफाइलमध्ये ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. यासंबंधीची लिंक खुली झाल्यानंतर आठ दिवसांत हे पसंतीक्रम द्यायचे आहेत. केवळ ऑनलाइन भरलेले पसंतीक्रम विचारात घेतले जाणार आहेत. 

परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करायची असल्यास गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविलेल्या तारखेपासून ऑनलाइन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्‍यक असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. 

राज्य सेवा परीक्षेतील पात्र उमेदवारांच्या मुलाखती पुणे, औरंगाबाद केंद्रांवर 16 ते 21 जानेवारी, मुंबई केंद्रावर 16 ते 21 आणि 23, 24 जानेवारी रोजी; तसेच नागपूर केंद्रावर 19 ते 21 जानेवारी रोजी होतील. मुलाखतीचा तपशीलवार कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाच्या उपसचिव विजया पडते यांनी म्हटले आहे. 

उत्पादन शुल्क निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या उंचीचा निकष यात तफावत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या अधिसूचनेत पुरुष उमेदवारांसाठी 165 सेंमी हा निकष आहे, तर केंद्राचा निकष 157.5 सेंमीचा आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन राज्याने उंचीचे निकष केंद्राप्रमाणे करावेत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान, संबंधित विभागाने ठरविलेल्या नियमानुसार आयोग काम करते, आयोग भरतीसंबंधी नियम ठरवीत नाही, असे आयोगाचे अध्यक्ष व्ही. एन. मोरे यांनी स्पष्ट केले. 

"वनसेवा'चा निकाल जाहीर 
आयोगाने 14 ऑगस्ट 2016 रोजी घेतलेल्या महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकालही जाहीर झाला आहे. या परीक्षेत खुल्या वर्गातून दिग्विजय बोडके आणि मागासवर्गीय गटात गणेश खताळे, महिला प्रवर्गात स्वाती गंबळे हे राज्यात प्रथम आले आहेत. यासंबंधी आयोगाने संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे. 

महाराष्ट्र

मुंबई - राज्य सरकारच्या विक्रीकर विभागातल्या कामगिरीवर महालेखापालांनी (कॅग) अनेक प्रकरणांत नाराजी व्यक्‍त केलेली असतानाच...

05.03 AM

मुंबई - राज्यातील बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यास उच्च न्यायालयाने आज पुन्हा मनाई केली. बैलांना शर्यतीदरम्यान इजा होणार...

03.57 AM

मुंबई - देश बलशाली बनवण्यासाठी सर्वांनी दुष्काळापासून मुक्ती, शेतकऱ्यांना कर्जापासून मुक्ती, समाजाला प्रदूषणापासून मुक्ती,...

03.03 AM