मलायका-अरबाजच्या घटस्फोटाला मंजुरी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई - अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा - खान यांच्या घटस्फोटाची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. गुरुवारी (ता. 11) वांद्य्राच्या कुटुंब न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.

मुंबई - अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा - खान यांच्या घटस्फोटाची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. गुरुवारी (ता. 11) वांद्य्राच्या कुटुंब न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.

1998 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. नोव्हेंबर 2016 मध्ये दोघांनी न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो गुरुवारी मंजूर केला. न्यायालयाच्या निर्णयानुसार मुलगा अरहानचा ताबा मलायकाला मिळाला असून अरबाज त्याला कधीही भेटू शकतो, असे निर्देशही न्यायालयाने दिले. त्यांचे वकील क्रांती साठे आणि अमृता साठे यांनी ही माहिती दिली. नवी मुंबईत बुधवारी (ता. 10) झालेल्या जस्टिन बिबरच्या लाईव्ह कॉन्सर्टला मलायका आणि अरबाज त्यांच्या मुलासह एकत्र दिसले होते.