...तर आमच्या पोरी पण म्हणतील 'चला रे तलवारी काढा'!!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा अजून जातीवर आलेला नाही, जर ठरवलं तर मराठ्यांशिवाय कोणीच निवडून येणार नाही. मराठा नेत्यांनी गद्दारी केली तर त्यांची जागा दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले आहेत

मुंबई - "मराठा समाज दुखावला; तर काय करेल याचा या सरकारला अंदाज नाही,' असा गर्भित इशारा मराठा मोर्चासमोर बोलणाऱ्या मुलींमधील पूजा मोरे या एका युवतीच्या भाषणामधून आज (बुधवार) देण्यात आला. "मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचंही केवळ गाजर दाखवलं. सरकारपुढे आम्ही आमच्या मागण्या ठेवल्या, परंतु सरकारला आमच्या समस्यांविषयी गांभीर्य नाही. आता आम्हाला दगा दिला; तर तलवारी काढून जागा दाखवू,' अशी संतप्त प्रतिक्रिया या मोर्च्यादरम्यान व्यक्त करण्यात आत आली.

 या भाषणामधील काही मुख्य मुद्दे पुढीलप्रमाणे -

 • छत्रपतींच्या राज्यात मुलीचा जो सन्मान राखला तोच सन्मान हवा आहे. कोपर्डीच्या भगीनीचा काय दोष होता. न्याय मिळालाचं पाहिजे. शांतता भंग होवू नये असं वाटत असेल तर त्या नराधमांना लवकरात लवकर फाशी द्या. कसं जगायचं या जंगलात ? हाच का शिवरायांचा महाराष्ट्र ? मी साहेबांना नागपूरात विचारले तर त्यांनी जलदगतीचं आश्वासन दिले. काय झालं त्या आश्वासनाचे...?? आम्ही छत्रपतींचे वारस आहोत क्रांती घडवणारे आहोत. हातात नांगर घेवून चालण्याची संस्कृती आहे, पण अन्यायाच्या विरोधात तलवार घेवून लढण्याची धमक आहे. आमची माथी भडकावू नका     
 • जिस दिन मराठे सुरू करेंगे राडा... आमच्या पोरी पण म्हणतील चला रे तलवारी काढा... रक्षाबंधन झालं पण कोपर्डीच्या भगिनीला न्यायाची ओवाळणी पडली नाही.                            
 • आम्हाला ना डोक्यावर ताज पाहिजे, ना सत्ता पाहिजे... आम्हाला सगळा मराठा समाज एक पाहिजे. 
 • वाटलं नव्हतं हक्कासाठी लढावं लागेल, ज्यांना सत्तेत बसवलं त्यांच्याशीच भिडावं लागेल. 
 • राजकारण्यांनो मराठा अजून जातीवर आलेला नाही, जर ठरवलं तर मराठ्यांशिवाय कोणीच निवडून येणार नाही. मराठा नेत्यांनी गद्दारी केली तर त्यांची जागा दाखवायला मागेपुढे पाहणार नाही. 147 मराठा आमदार हातावर हात ठेवून बसले आहेत.    
 • जसे जमलो एकीने पुन्हा पांगणार नाही. जिजाऊंची शपथ घेवून सांगते पुन्हा मराठा जात लावणार नाही. 
 • अॅट्रासिटीचा गैरवापर होत आहे. त्यात सुधारणा झालीच पाहिजे. 
 •  नका ठेवू वाईट नजरा जिजाऊंच्या लेकीवर, अख्खा महाराष्ट्र पेटून उठेल मराठ्यांच्या एकीवर..!  
 • आरक्षण आम्हाला शिकू देत नाही, अन दुष्काळ बापाला पिकवू देत नाही. कसं करणार गरीब बाप आमचं शिक्षण?
 • हा मोर्चा कोणत्याही जाती विरोधात नाही. 
 • होऊन जावू दे पुन्हा एकदा तो रांगडा जोश, दाही दिशेनं घुमूदे छत्रपती 
 • जो मराठा हित की बात करेगा, वही देश पे राज करेगा. 
 • मुख्यमंत्री तुम्ही आम्हाला कर्जमाफीचं गाजर दाखवलं. 
 • मराठ्यांसोबतच का राजकारण करता ? राजे छत्रपतींची जयंती सुध्दा एका दिवशी करत नाहीत ! आता एकाच दिवशी 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती.
 • मराठा समाज डाॅ. बाबासाहेब, गौतम बुध्दाच्या विचाराने चालणारे आहे. 
 • फडणवीस साहेब आम्ही 57 मोर्चे काढले, आता मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमच्या सरकारचेही 'चले जाव ' केले जाईल. 
 • छत्रपतींच्या नावाने मतं मागितली त्यांचीच भूमिका पायदळी तुडविली जात आहे. 
 • फडणवीस, तुमचा अभ्यास किती दिवस सुरू राहणार आहे? अभ्यास सुरू, अभ्यास सुरू, किती दिवस ऐकायचं, मला तर शंकाच आहे. फडणवीस साहेबांनी कोणत्या गुरूजींकडे क्लास लावला आहे. ही विनंती समजा, सूचना समजा, इशारा समजा किंवा धमकी समजा...!!!!!
 • या जिजाऊंच्या लेकींना साधं संरक्षण देता येत नाही तुम्हाला ? अहो एक वर्षानंतरही नराधम जिवंत आहेत ? अरे नेमकं मराठा लागतो तरी कोण तुमचे..?    
 • शिव स्मारकाचं अरबी समुद्रात भूमिपुजन केलं. पुढं काय केलं? आता मुंबई काबीज केली. आम्हाला दिल्लीला जायला वेळ लागणार नाही...! 
 • आमच्या भगिनीवर बलात्कार झाला, काय वेदना असतील ते विचारा फडणवीस आपल्या आई बहिणीला...! 
 • आम्ही दिल्लीत आता मौन नसू. तलवारी म्यानात आहेत; त्या बाहेर काढण्याची वेळ येवू देवू नका. 
 • यानंतर मराठ्यांच्या लेकीवर कोणी हात टाकायचा प्रयत्न केला तर मायबाप सरकारा कायदा बाजूला ठेवून तलवारी हातात घेवू. शपथ, आजपासून आम्ही कोणत्याही महिलेवर अत्याचार होवू देणार नाही.