सर्व जाति-धर्मांनी मराठा समाजाला पाठबळ द्यावे- राणे

टीम ई सकाळ
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

आतापर्यंतचे सर्व मोर्चे मूक मोर्चे होते. त्याचप्रमाणे हा मोर्चादेखील मूक मोर्चा असेल. 

मुंबई : आतापर्यंत महाराष्ट्रात होऊन गेलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये बहुतांश मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते. त्यांनी इतर समाजांना आरक्षणाचा लाभ देताना संपूर्ण सहकार्य केले. त्याचप्रमाणे सर्व जाती-धर्मांच्या समाजाने मराठा समाजाला पाठबळ द्यावे, असे आवाहन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. 

आपापल्या जिल्ह्यात मोर्चे काढल्यानंतर आता राजधानी मुंबईमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे. आतापर्यंतचे सर्व मोर्चे मूक मोर्चे होते. त्याचप्रमाणे हा मोर्चादेखील मूक मोर्चा असेल. 

मराठा समाजातील आर्थिकृष्ट्या दुर्बल लोकांना कुठेही आरक्षणाचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी या मोर्चाद्वारे त्यासंदर्भात जोरदार मागणी करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. 

भायखळा येथून सकाळी अकरा वाजता मोर्चा निघणार असून, आझाद मैदानावर येऊन थांबेल. त्यानंतर मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांना निवेदन देतील असे नियोजन बैठकीत ठरविण्यात आले असल्याचे राणे यांनी सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :