मराठा समाजाचा परळीत दुसऱ्या दिवशीही ठिय्या

बीड - येथेही मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बीड - येथेही मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

बीड/परळी वैजनाथ - मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय शासनाने मेगाभरती करू नये, या मागणीसाठी परळीत बुधवारपासून (ता. 18) सुरू झालेला मराठा क्रांती ठोक मोर्चाची धग आणि पाठिंबा जिल्ह्यात वाढत आहे. परळीत मोर्चेकऱ्यांनी तहसील आवारातच रात्र काढल्यानंतर गुरुवारीही (ता. 19) ठिय्या सुरूच असून, महिलांचा सहभागही वाढला आहे.

बीडमध्ये गुरुवारी ठिय्या आंदोलन, वडवणीत रास्ता रोको; तर टालेवाडी (ता. माजलगाव) येथे बस फोडण्यात आली. बस फोडल्याप्रकरणी दिंद्रूड पोलिसांनी चौघांना अटक केली. ठोस आश्वासनाशिवाय परळीतून माघार नाही, असा पवित्रा घेत आंदोलकांनी रात्रीचा मुक्कामही केला. राज्य सरकारने सुरू केलेली मेगा नोकरभरती मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत थांबवावी. मराठा समाजाला आरक्षण लागू करावे.

कोपर्डी येथील पीडित मुलीला न्याय द्यावा, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत आदी मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे बुधवारी मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन पुकारले होते. आंदोलक रात्रभर उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात ठिय्या मांडून होते. दरम्यान, आंदोलनस्थळीच खिचडी शिजवून सहभागींना देण्यात आली, तर परळीतील काहींनी पिठलं-भाकर पुरवली. रात्री दहादरम्यान कीर्तन झाले. त्यानंतर जागरण-गोंधळ झाले. रात्रभर आंदोलक सरकारविरोधात घोषणा आणि बोंबा मारून निषेध करत होते. आता चर्चा नाही, तर निर्णय आल्यासच आंदोलन मागे घेणार अन्यथा इथेच ठिय्या, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. रात्री पांघरण्यासाठी काही नसल्याने अनेकांच्या अंगावर रिकामे पोतडी आढळून आले. सकाळी इथेच चुली पेटवून आंदोलकांना चहापान करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com