मराठा आरक्षण याचिकांवर आजपासून सुनावणी 

मराठा आरक्षण याचिकांवर आजपासून सुनावणी 

मुंबई - मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सोमवारपासून (ता.27) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. राज्यभर काढलेल्या आरक्षण मोर्च्यांच्या पार्श्‍वभूमीवर विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयातील याचिकांची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार उद्यापासून सुनावणी होत आहे. उच्च न्यायालयाच्या रूम नं. 52 मध्ये न्या. मंजुला चेल्लूर यांच्या खंडपीठासमोर ही दैनंदिन सुनावणी होणार आहे. 

महाराष्ट्र सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावर सात डिसेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. 80 टक्‍क्‍यांहून अधिक मराठा समाज मागासलेला आहे. त्यामुळे त्याला आरक्षण द्यावे, असे प्रतिज्ञापत्र सरकारने गेल्या वेळच्या सुनावणीत सादर केले होते. कर्जबाजारी शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचा दावाही सरकारने केला होता. त्यामुळे यापुढील सुनावणीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com