"मराठी अस्मिते'वरून शिवसेना-भाजपत जुंपणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

मुंबई - शिवसेना आणि मनसेने महापालिका निवडणुकीत "मराठी अस्मिते'च्या मुद्याला प्राधान्य दिले आहे. आता भाजपच्याही अजेंड्यावर मराठी अस्मिता आहे. जाहिरनाम्यात मराठी अस्मितेचा मुद्दा भाजपने मांडला आहे. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत रंगण्याची चिन्हे आहेत. 

भाजपने हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून पालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरवात केली. यातून मुंबईवासीयांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न झाला. भाजपने आज प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहिरनाम्यात मराठी अस्मितेचा मुद्या घेतला आहे. मुंबईत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या अभ्यासक्रमात संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाचा धडा समाविष्ट केला जाईल, पालिकेतर्फे मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी विशेष योजना राबवणार, या विभागामार्फत संगणकावर व संकेतस्थळावर मराठीचा वापर अधिकाधिक वाढवण्यात येईल, मुंबई मराठी साहित्य संमेलन भरवणार, मुंबईच्या इतिहासाचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे - संस्कृतीचे दर्शन घडवणारे "मुंबई म्युझियम' उभारणार, मुंबई शहराचे ग्रामदैवत श्री मुंबादेवी मंदिर परिसर विकसित करणार, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाला ऊर्जितावस्था देणार, मराठी नाटकांना पालिकेचे नाट्यगृह सवलतीच्या दरात प्राधान्याने देणार आदी विषय भाजपने जाहिरनाम्याच्या अजेंड्यावर घेतले आहेत. त्यामुळे मराठी अस्मितेवरून शिवसेना - भाजपमध्ये जुंपण्याची शक्‍यता आहे.