मराठी रीडर "ऍप'द्वारे पुस्तके वाचकांच्या हातात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - सध्याच्या "हायटेक' जमान्यात केवळ छापील पुस्तकांवर किंवा "ई-पुस्तक' विकणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतः या व्यवसायात उतरून "ई-पुस्तकां'ची निर्मिती व विक्री करण्याचे धाडसी पाऊल प्रकाशकांनी उचलले आहे. मुंबई-पुण्यातील आघाडीच्या सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन "मराठी रीडर' हे ऍप तयार केले आहे. डोंबिवलीत होणाऱ्या 90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे औचित्य साधत त्याचे अनावरण करण्यात येणार आहे. 

सध्याच्या काळात "ई-पुस्तके' काही वेळा "पीडीएफ' किंवा इतर कंपन्यांद्वारे "ई-पब' स्वरूपात तयार केली जातात; मात्र यासाठी प्रकाशकाला दुसऱ्या कंपनीची मदत घ्यावी लागते. त्याऐवजी छापील पुस्तकासारखाच दर्जा "ई-पुस्तका'लाही द्यावा, यासाठी प्रकाशकांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. राजहंस, मौज, पॉप्युलर, रोहन, ज्योत्स्ना, कॉण्टिनेन्टल अशा सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन हे "ऍप' तयार केले आहे. 

पहिल्या टप्प्यात शंभर ते दीडशे पुस्तके यावर अपलोड करण्यात येणार असून, तांत्रिक चाचणी यशस्वी झाल्यानंतर हजारवर पुस्तके रसिकांसाठी उपलब्ध करण्यात येतील, असे राजहंस प्रकाशनचे डॉ. बोरसे यांनी सांगितले. मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप या सर्वांवर ती वाचता येतील. वाचण्यासाठी कोणत्याही रीडर ऍप्लिकेशनची गरज पडणार नाही. यापुढच्या काळात अधिकाधिक प्रकाशकांना यात सहभागी करून मराठी पुस्तके ग्लोबल करण्याचा प्रयत्न केला जाईल. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुस्तकांवर 50 टक्के व त्यानंतर 25 टक्के सूटही देण्यात येईल. 

"ऍप'ची वैशिष्ट्ये 
- विविध प्रकाशकांची पुस्तके एकाच "ऍप'वर उपलब्ध 
- "ई-पब' स्वरूपातील पुस्तके 
- फॉण्ट लहान मोठा करणे, बुकमार्क, परिच्छेद अधोरेखित करणे, वाचताना डे व नाइट मोडद्वारे प्रकाश कमी-जास्त करणे. 
- फोन हरवल्यास रजिस्टर्ड आयडीवरून पुन्हा मोफत पुस्तक डाउनलोड करण्याची सुविधा. 
- पुस्तक कॉपी किंवा प्रिंट करता येणार नाही. 

महाराष्ट्र

मुंबई : परभणीचे संघाचे कार्यकर्ते रमेश जाधव यांच्या वाढदिवसाचे पत्र केवळ नावातील साधर्म्यामुळे अनावधानाने रा. ग. जाधव यांना गेले...

07.00 PM

पुणे : मागील वर्षी निधन झालेले ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक रा. ग. जाधव यांना चक्क राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी...

01.39 PM

राज्याच्या मुख्य सचिवांच्या पत्नीकडून गैरवापर मुंबई: राज्य सरकारच्या सह्याद्री राज्य अतिथिगृहाचा वापर आणि बैठकांबाबत स्पष्ट...

10.06 AM