कंपन्यांकडून खेळाडूंना मिळणाऱ्या निधीची त्रयस्तांद्वारे चौकशी-सुमारीवाला 

श्रीकृष्ण कुलकर्णी
शनिवार, 24 मार्च 2018

नाशिक: स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे राज्यातील नावाजलेल्या कंपन्यांकडून आपल्या "सीएसआर' निधीतून खेळाडूंना लाखो रूपयांची मदत करतात. ही चांगली बाब आहे. पण सातत्याने ठराविक खेळाडूंलाच ही मदत मिळते, काहीजण गुणवत्ता असूनही वंचित राहतात. त्यासाठी हा निधी व प्रक्रीयेची त्रयस्तांद्वारे चौकशी केली जाईल,असे भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी "सकाळ'शी बोलतांना सांगितले.

नाशिक: स्पर्धांमधील चांगल्या कामगिरीच्या आधारे राज्यातील नावाजलेल्या कंपन्यांकडून आपल्या "सीएसआर' निधीतून खेळाडूंना लाखो रूपयांची मदत करतात. ही चांगली बाब आहे. पण सातत्याने ठराविक खेळाडूंलाच ही मदत मिळते, काहीजण गुणवत्ता असूनही वंचित राहतात. त्यासाठी हा निधी व प्रक्रीयेची त्रयस्तांद्वारे चौकशी केली जाईल,असे भारतीय ऍथलेटिक्‍स महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी "सकाळ'शी बोलतांना सांगितले.

जादा वय व उत्तेजक द्रव्यातही पळवाटा भरपूर आहे. त्या रोखण्यासाठी स्वतंत्र समिती नियुक्त केली आहे. नव्याने तयार केलेल्या क्रीडासंहितेचे(स्पोर्टस्‌कोड) आम्ही स्वागतच करतो मात्र त्यात चर्चेतून काही बदल व्हायला हवे,असे वाटते 

राज्य ऍथलेटिक्‍स स्पर्धेच्यानिमित्ताने श्री.सुमारीवाला नाशिकला आले होते. त्यावेळी त्यांनी "सकाळ'शी बोलतांना विविध मुद्यांवर संवाद साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी मुंबई,ठाणे,पुणे,नाशिक,औरंगाबाद अशा मोजक्‍याच शहरापुरता मर्यादित असलेल्या ऍथलेटिक्‍स आता वाढत आहे. पण हा खेळ शहरापेक्षा ग्रामीण भागात वाढविण्यासाठी मुलभूत सुविधा,प्रशिक्षणाकडे आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात 10,12,14 या वयोगटात खरे टॅलेट असल्याने तेथेच नावाजलेल्या प्रशिक्षकांकडून प्रशिक्षण देण्यावर आमचा भर असेल.    जिल्हा निवड चाचणी स्पर्धांतील सहभाग वाढतो असून खेळाडूंची निवास,भोजन,प्रवास व प्रशिक्षणाची व्यवस्था आम्ही करत आहोत. खेळाडूंनी फक्त सहभागी व्हायचे बाकी कुठलाही खर्च करायचे नाही. 
 

निवड चाचणीत भाग सक्तीचा अन्यथा अपात्र 
फेडरेशनतर्फे जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रत्येक निवड चाचणीत खेळाडूंनी सहभाग नोंदवलाच पाहिजे,असे नमूद करून ते म्हणाले,पुणे,मुंबईपुरती मर्यादीत असणारी फेडरेशन आता बाहेर पडली असून राज्यात सर्वत्र निवड चाचणी आम्ही घेत आहोत. या स्पर्धामध्ये सहभाग न घेणाऱ्या खेळाडू,जिल्ह्यांना त्या-त्या वर्षापूरते अपात्र ठरवले जाईल. त्यांना कुठल्याही गटात सहभागी होता येणार नाही. ही अपात्र टाळण्यासाठी सहभाग आवश्‍यक आहे. नाशिकमध्ये प्रशिक्षक व संघटनेचे सहसचिव राजीव जोशी यांची संघटना मान्यताप्राप्त आहे. इतरांचा सहभाग हा ग्राहय धरला जाणार नाही. 

"बाबूगिरी'रोखण्याची गरज 
क्रीडाविभागात कार्यरत अधिकारीबाबू हे मंत्र्यांना चूकीची माहिती देऊन खेळाडू,संघटनांबद्दल गैरसमज पसरवतात ही बाबूगिरी रोखण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही क्रीडामंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या चूकीच्या बाबूगिरीमुळे अनेक खेळाडू,प्रशिक्षकांना स्पर्धेच्या सहभागापासून वंचित रहावे लागले आहे. क्रीडाविभाग,मंत्रालयस्तरावर कामात सुधारणा व्हायला हवे असे वाटते. 
"सीएसआर' निधी देतांना कंपन्यांनीही विचार करावा 
कंपन्यांना आपला "सीएसआर'निधी खर्च करणे बंधनकारक असल्याने त्या तो खर्ची करतात असे सांगुन ते म्हणाले,उत्कृष्ठ कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना या निधीतून भरघोस मदत मिळू लागली आहे. खेळाडूंच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे. पण कंपन्यांनी या निधीचे वर्गीकरण करावे, एकाच खेळाडूंना निधी न देता त्यांचे इतर खेळाडूंसाठी विभागणी करावी, म्हणजे सर्वांना समान न्याय मिळेल. आम्ही त्रयस्तामार्फेत ही चौकशी करणार असून हे लोक कंपन्यांशी संपर्क साधून चर्चा करतील,आगामी काळात सकारात्मक निर्णय होईल,असे वाटते. 

कॉमनवेल्थपेक्षा अशियाई स्पर्धेकडे लक्ष 
कॉमनवेल्थ स्पर्धेत चांगली कामगिरी बजावत पदके संपादन केली होती. अशियाई स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून मार्चअखेर व एप्रिलची सुरवात आणि गेल्या नोव्हेंबरमधील चाचणी घेऊन केलेले नियोजन हे त्याचउद्देशाने होते. या स्पर्धेत 20 पर्यत पदके मिळवू अशी आशा वाटते. त्यादृष्टीने तयारी सुरु आहे. 

समितीवर अविश्‍वास कसा दाखविणार 
आंतरष्ट्रीय,राष्ट्रीयस्तरावरील निवड करतांना बहादूरसिंग,अंजु बॉबी जॉर्ज,पीटी उषा,उदय प्रभू,बहादूरसदगू,श्रीराम सिंग,प्रविण जॉली,गुरुचरणसिंग रंधवा असे एकापेक्षा एक सरस अनुभवी मान्यंवर आहेत. त्यांच्याकडून निवड केली जाते. मग अशा कमिटींवर तुम्ही अविश्‍वास कसा दाखविणार, शासनाने नियोजन करावे मात्र स्पर्धेंच्या अमंलबजावणीचे काम आमचे आहे,हे त्यांनी विसरू नये. 

उत्तेजक द्रव्य गंभीर बाब 
या चाचणीत नावाजलेले धावपटूंचा प्रश्‍न नाही.फक्त जे धावपटू संघाबाहेर राहतात ते "नाडा'सारख्या समितीसमोर येण्याऐवजी तोंड लपवतात व नंतर उत्तेजक द्रव्य घेऊन आपली क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करता. कनिष्ठ गटात ही समस्या मोठी आहे.जादा वय व उत्तेजनक द्रव्य रोखण्यासाठी आगामी वर्षात आता नाडाच्या जोडीला आमची स्वतंत्र समिती हे काम करेल,असे ते म्हणाले, 
 

Web Title: marathi news adil sumariwala