तीन मुलींसह विहिरीत आईचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

नीळकंठ कांबळे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहारा : तीन मुलींसह आईचा मृतदेह विहिरीत आढळून आले आहेत. या चौघींचाही मृत्यू संशयास्पद असून, आत्महत्या की घातपात, याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. सलगरा (दिवटी, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथे मंगळवारी (ता. १९) हा प्रकार घडला. दुपारी आईचा मृतदेह विहिरीतून काढण्यात आला. त्यानंतर तिन्ही मुलींचे मृतदेह काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत होते. रात्री आठच्या सुमारास या तिन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून पाण्याबाहेर काढण्यात पोलिस व ग्रामस्थांना यश आले. 

छाया मधुकर चव्हाण (वय ४०), त्यांच्या मुली शीतल चव्हाण (वय १९), पल्लवी चव्हाण (वय १७) आणि अश्विनी चव्हाण (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. रात्री आठच्या सुमारास विहिरीतून काढण्यात आलेले मृतदेह शवविच्छेदनासाठी सलगरा (दिवटी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. तिन्ही मुलींचे मृतदेह काढल्यानंतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. या चौघींनी आत्महत्या केली की घातपात, याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

सलगरा (दिवटी) येथे गावापासून दीड किलोमीटर छाया चव्हाण यांची शेती असून, स्वतःच्याच शेतातील विहिरीत हे मृतदेह आढळले आहेत. या चौघींनी आत्महत्या केली नसून, त्यांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकले असल्याचा आरोप छाया यांचा भावाने केला आहे.