मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या शिवसेनेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

मुंबई - सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) या शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा ड्रिम प्रोजेक्‍ट असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम येत्या डिसेंबर पासून सुरु होणार आहे. कोस्टल रोडचे काम सुरु होण्याआधीच या सागरी रस्त्याला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तसा प्रस्ताव पालिकेतील गटनेत्यांच्या सोमवारी होणाऱ्या बैठकीत सादर केला जाणार आहे.

कोस्टल रोड बांधण्याचे आश्वासन शिवसेनेने आपल्या वचननाम्यातून दिले होते. पालिकेत सत्ता आल्यानंतर कोस्टल रोडला लवकरात लवकर सुरूवात कशी सुरुवात होईल यासाठी शिवसेना प्रयत्नशील होती. याबाबत स्थायी समितीत प्रस्ताव आल्यावर सादरीकरणही झाले होते. या सादरीकरणा दरम्यान कोस्टल रोडचे काम सुरु होणार असल्याचे कळताच शिवसेनेने या कोस्टल रोडला "छत्रपती शिवाजी महाराज सागरी महामार्ग" असे नाव देण्याची मागणी शिवसेनेचे नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी पालिकेचे सभागृह नेते यशवंत जाधव यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. कीर्तिकर यांच्या मागणीनुसार यशवंत जाधव यांनी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी आणण्याची मागणी केली होती. त्यानुसार उद्या सोमवारी 10 जुलै रोजी होणाऱ्या गटनेत्यांच्या बैठकीत या बाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.