विहिरीतील पाण्यात बुडून पती- पत्नीचा दुर्दैवी मृत्यू 

विहिरीतील पाण्यात बुडून पती- पत्नीचा दुर्दैवी मृत्यू 

केळघर - केडंबे (ता. जावळी) येथील पत्नी- पत्नीचा आज विहिरीत बुडून दुर्दैवी अंत झाला. या घटनेबाबत हळहळ व्यक्त होत आहे. नंदा सुरेश गायकवाड (वय 39) व सुरेश काशिनाथ गायकवाड (वय 45) अशी मृत पती- पत्नीची नावे आहेत. 

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, केडंबे येथे आज संध्याकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास बौद्ध वस्तीतील विहिरीवर जनावरांना पाणी पाजण्यासाठी नंदा सुरेश गायकवाड (वय 39) गेल्या होत्या. त्या वेळी त्या पाय घसरून विहिरीत पडल्या. पाण्यात बुडू लागल्याने त्यांचा आरडओरडा एकून त्यांना वाचवण्यासाठी पती सुरेश काशिनाथ गायकवाड (वय 45) गेले. त्या वेळी तेही विहिरीतील पाण्यात बुडाले. या घटनेत गायकवाड पती- पत्नीचा विहिरीतील पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. 

गायकवाड दांपत्यांच्या दुर्दैवी अंतामुळे गावासह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. 15 दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या आईचेही वृद्धापकाळाने निधन झाले होते. 15 दिवसांतच घरातील तीन व्यक्तींचा अंत झाला. श्री. गायकवाड यांच्या मागे मुलगा आहे. गायकवाड यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वपरिचित होते. या घटनेची नोंद मेढा पोलिस ठाण्यात झाली असून, सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com