अंजली दमानियांच्या तक्रारीनुसार खडसेंविरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

खडसेंनी लज्जास्पद वक्तव्य केल्याचा दावा करत दमानिया यांनी बुधवारी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या तक्रारीनुसार माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरोधात गुरुवारी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पुढील तपासासाठी हे प्रकरण जळगावमध्ये वर्ग करण्यात आले आहे.

खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. 2) जळगावमधील मुक्ताईनगर येथे कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात खडसेंनी तुमच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याची माहिती एका महिलेने दमानिया यांना दिली. खडसेंनी लज्जास्पद वक्तव्य केल्याचा दावा करत दमानिया यांनी बुधवारी वाकोला पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या कार्यक्रमाचा अहवाल वाकोला पोलिसांकडे नव्हता. तो मिळवून पाहिल्यानंतर पोलिसांनी खडसेंविरोधात कलम 509 अन्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, खडसे यांनी अनेक सभांमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे दमानिया यांनी सांगितले.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
सदाभाऊ यांचा अखेर 'सवतासुभा'
इनक्‍युबेटरचा सरसकट वापर अनावश्‍यक
ओडिशात आघाडी करणार नाही: अमित शहा
फिरोज, ताहीर यांना फाशीची शिक्षा
श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे
उच्चशिक्षण क्षेत्रासमोरच्या आव्हानांवर चिंतन
बैलांच्या शर्यतींबाबतचा मसुदा अंतिम टप्प्यात
तरंगत्या सौर पॅनेलद्वारे 'उजनी'वर ऊर्जानिर्मिती शक्‍य
हिंसाचाराला "डेरा'चे आर्थिक पाठबळ
कोमलला मिळाले मदतीचे ‘हृदय’

महाराष्ट्र

मुंबई  - ज्या सोशल मीडियाच्या शिडीवरून भाजपने केंद्र आणि राज्यात सत्ता काबीज केली, तोच सोशल मीडिया भाजपसाठी कर्दनकाळ...

07.52 AM

पुणे - हवेचा दाब कमी झाल्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडत आहे. पुणे-मुंबईसह राज्याच्या...

04.36 AM

मुंबई - भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे गुरुवारी (ता. 21) घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गाबरोबरच...

04.33 AM