शेतकरी कर्जमाफीची यादी अशी शोधा...

गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

राज्य सरकारने शेतकऱयांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱयांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. ही वेबसाईट कशी पाहावी, याची माहिती...

राज्य सरकारने शेतकऱयांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱयांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना असे नाव सरकारने या कर्जमाफीला दिले आहे. त्यासाठीच्या वेबसाईटचा पत्ता आहे https://csmssy.in

वेबसाईटवर सर्वात उजव्या बाजूला अर्जदारांची यादी आणि लाभार्थ्यांची यादी असे दोन ऑप्शन्स आहेत. 

अर्जदारांची यादी या ऑप्शनवर क्लिक केल्यास आपल्या गावातील किती लोकांनी अर्ज केले आहेत त्यांची नावे, अर्ज केल्याची तारीख, बँक इत्यादी माहिती मिळते. 

लाभार्थ्यांची यादी या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर नवीन विंडोमध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत यामध्ये आपापली माहिती सिलेक्ट करायची आहे. 

बँक, बँकेची शाखा ही माहिती सोबत असेल, तर पटकन संपूर्ण यादी मिळू शकते. 

ही माहिती नसेल, तर संपूर्ण गावाची यादी येते, ज्यातून स्वतःचे नाव शोधावे लागेल. यासंदर्भात वेबसाईटवर आणखी तपशील उपलब्ध आहे.