विसर्जनावेळी बुडून राज्यात 9 जणांचा मृत्यू; पाच लहान मुलांचा समावेश

Marathi news at least 9 drowned in Maharashtra during Ganesh immersion
Marathi news at least 9 drowned in Maharashtra during Ganesh immersion

गणेश विसर्जनाच्या मिरवणुका राज्याच्या विविध भागांत शिगेला पोहोचल्या असतानाच नदी, तलावांमध्ये बुडून वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल नऊ जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या हाती आल्या आहेत.

मरण पावलेले बहुतांश वयाच्या विशीच्या आतील आहेत. नदीत, तलावात, बंधाऱयात पाण्याचा अंदाज न आल्याने या तरूणांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यातील नंदाणे गावात शाळकरी मुलगा बंधाऱयाच्या गाळाचा अंदाज न आल्याने पाण्यात फसला आणि बुडून मरण पावला. अशीच घटना बीड जिल्ह्यातही घडली आहे. बंधाऱयातील गाळात रुतत गेल्याने माजलगाव (जि. बीड) येथे मुलगा बुडून मरण पावला.

पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवडमधील जगताप डेअरीजवळ संध्याकाळी दोनजण बुडाल्याचे वृत्त आहे. महापालिकेने नदीकाठावर दक्षता पथके नियुक्त केली आहेत. ही पथके बुडालेल्या दोघा तरूणांचा शोध घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांच्याविषयी काहीही समजलेले नाही.

सातारा जिल्ह्यातील कुडाळ (ता. जावळी) गणपती विसर्जन करताना हेमंत वाघ (वय 18) या तरूणाचा बुडुन मृत्यू झाला आहे. नाशिकमधील नाशिकरोड येथे किशोर कैलास सोनार लोळगे (वय 20) याचा गणपती विसर्जन करताना नदीत बूडन मृत्यू झाला आहे.

सर्वात मोठी दुर्घटना औरंगाबाद जिल्ह्यात बिडकीन येथे घडली. तेथे शिवणी तळ्यात गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. 
मृतांमधे सागर सुरेश तेलभाते (वय १३)  आदित्य ताराचंद किर्तिशाही (वय १२) आणि राजेश सुनील गायकवाड (वय १२) यांचा समावेश आहे. अर्जुन सुभाष पोपळघट (वय १२) याचे प्राण वाचले. सर्व मृतदेह औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आले आहेत, असे 'सकाळ'चे बातमीदार गणेश सोनवणे यांनी कळविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com