कोट्यवधी लुटणाऱ्या नीरव मोदीला पकडा - शरद पवार

कोट्यवधी लुटणाऱ्या नीरव मोदीला पकडा - शरद पवार

लोणंद - देशात एक नंबरची सहकारी बॅंक म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नाव आहे. या बॅंकेची चौकशी करण्याची पावले राज्य सरकार उचलू पाहत आहे. सध्या चांगले काम करणाऱ्यांची चौकशी केली जाते आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारा नीरव मोदी देशाबाहेर पळून जातो. आधी त्याला पकडा, अशी मागणी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथे केली.  

पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पाच दशके पूर्ण झाल्याबद्दल येथील सुवर्णगाथा उत्सव समिती, साद सोशल ग्रुप, विकासाधार मंच आदी संस्थांच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरवण्यात आलेल्या शरद कृषी महोत्सवाचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, ‘‘पंजाब नॅशनल बॅंकेतील ११ हजार कोटींची चोरी करणारा नीरव मोदी कुठे गेला, हे कोणाला माहिती नाही. त्याविषयी सरकार चकार शब्द काढत नाही. मात्र, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची, तसेच दुष्काळात छावण्यांद्वारे जनावरे जगवणारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सरकार नेमके कोणासाठी चालवले जात आहे, हेच कळत नाही.’’

‘‘शेती, संस्कृती, कला व विज्ञान आदी क्षेत्रात चांगले काही तरी करण्यासाठी डॉ. नितीन सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी साद सोशल ग्रुपच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषद, लोणंद, कोरेगाव समित्यांच्या सहकार्याने भरवलेले प्रदर्शन उपयोगी ठरेल, असे पवार म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com