सतीश चतुर्वेदी यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी 

सतीश चतुर्वेदी यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी 

मुंबई - पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांची कॉंग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. 

नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोर उमेदवार उभे करणे तसेच पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा ठपका चतुर्वेदी यांच्यावर पक्षाच्या चौकशी समितीने ठेवला होता. याप्रकरणी चतुर्वेदी यांना शहर कॉंग्रेसतर्फे 25 जानेवारीला कारणे दाखवा नोटीस बजावून 7 दिवसांत स्पष्टीकरण मागितले होते. विशेष म्हणजे प्रदेश कॉंग्रेसच्या लेखी सूचनेवरून ही नोटीस बजावण्यात आली होती; मात्र चतुर्वेदी यांनी नोटीसला उत्तर दिलेले नाही. उलट अशी कुठलीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचा दावा केला होता. 

चतुर्वेदी यांच्यावरील ठपका  
- महापालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत वादविवाद निर्माण करणे 
- कॉंग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात बंडखोरांना मदत करणे 
- बंडखोर उमेदवारांचा उघडपणे प्रचार करणे 
- याशिवाय बऱ्याच कालावधीपासून पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com