विधान परिषद: अपेक्षेप्रमाणे लाड विजयी; काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली?

Marathi news Maharashtra MLC election Prasad Lad BJP wins
Marathi news Maharashtra MLC election Prasad Lad BJP wins

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे प्रसाद लाड विजयी झाले आहेत. त्यांना 209 मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या दिलीप माने यांना 73 मते मिळाली आहेत.

सत्ताधारी भाजप, शिवसेनेसह विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्ष आमदारांनी मतदानासाठी सकाळीपासून विधानभवन परिसरात गर्दी केली. मतदान ४ वाजेपर्यंत चालले; त्यानंतर लगेचच मतमोजणी सुरू झाली. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची किमान दहा मते फुटली असल्याचे लाड यांना मिळालेल्या मतांवरून स्पष्ट झाले आहे. काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांचे पूत्र आमदार नितेश राणे यांचे मत काँग्रेस उमेदवाराला जाण्याची आधीही शक्यता नव्हती. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे लाड यांचा विजय सोपा मानला जात होता. 

सध्या विधानसभेत भाजपचे 122, शिवसेनेचे 63, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी 3 , अपक्ष 7, एमआयएमचे 2 तर; सपा, रासपा, मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे प्रत्येकी एक आमदार आहेत. शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे लाड यांना 185 मतांपर्यंत पोहोचण्यात काहीच अडचण नव्हती. शिवाय, अपक्ष 20 मतेही लाड यांच्याकडेच वळली असल्याचे त्यांना मिळालेल्या मतांवरून दिसते आहे. 

लाड मुळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना पक्षात थेट उपाध्यक्ष पदही देण्यात आले. नारायण राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशानंतर त्यांना विधान परिषद उमेदवारी मिळेल, असे गृहित धरले जात होते. प्रत्यक्षात त्यांच्या उमेदवारीला शिवसेना कडवा विरोध करणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लाड यांचे नाव विधान परिषदेसाठी पुढे आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com