भाजपच्या 39 आमदार, 11 खासदारांचे भवितव्य धोक्यात

bjp
bjp

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत पक्षातील नेत्यांची कानउघडणी करत, सावधगिरी बाळगा अन्यथा कारवाईला सज्ज रहा. असा इशारा दिला. 
भाजपच्या आमदार-खासदारांना भ्रष्टाचारापासून लांब राहण्याची समज देत अनेक आमदार-खासदारांचं भवितव्यही धोक्यात असल्याचं धक्कादायक अहवाल असल्याचा इशारा दिला.

भाजपची शनिवारी आढावा बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी भाजपाच्या अंतर्गत सर्व्हेवरुन नेत्यांना सावधानतेचा इशारा दिला.

भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार 122 पैकी 39 आमदार, तर 23 पैकी 11 खासदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत असल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी खडसावले.

प्रत्येक आमदार-खासदाराचं रिपोर्ट कार्ड बनवून कामाचा अहवाल घेतला जाणार आहे. काम न करणाऱ्या लोकप्रतिनिधींना येत्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार-खासदारांना स्वतःच्या मतदारसंघासोबतच 2014 च्या निवडणुकीत, भाजप पराभूत झालेल्या मतदारसंघातही लक्ष घालण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजपची स्वबळावर लढण्यासाठी जोरदार हालचाली आतापासूनच सुरु करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com