सत्ताधाऱ्यांचा बहिष्कार कायम; विधानपरिषद तहकूब

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

विधानपरिषदेच्या कामकाजाची संहिता तयार होत नाही, तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका सत्ताधारी यांनी घेतली आहे. त्यामुळे वेळापत्रकात भरपूर कामकाज दाखवण्यात आले असले तरी विधानपरिषदमध्ये किती कामकाज होणार का यांवर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.

मुंबई : विधान परिषदेत सत्ताधाऱयांनी कामकाजवर बहिष्कार कायम ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 1 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यामुळे पावसाळी अधिवेशनचा आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांचे संख्याबळ जास्त असलेल्या विधानपरिषदमध्ये चक्क सत्ताधारी यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.

विधानपरिषदेच्या कामकाजाची संहिता तयार होत नाही, तोपर्यंत कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका सत्ताधारी यांनी घेतली आहे. त्यामुळे वेळापत्रकात भरपूर कामकाज दाखवण्यात आले असले तरी विधानपरिषदमध्ये किती कामकाज होणार का यांवर प्रश्नचिन्हच निर्माण झाले आहे.

विरोधक एक पाऊल पुढे टाकत सत्ताधारी यांची समजूत घालतात का आक्रमक सत्ताधारी एक पाऊल मागे घेतात यावर परिषदमधील कोंडी फुटणार की नाही हे स्पष्ट होणार आहे. परिषदचे कामकाज सुरू होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधक यांची बैठक अपेक्षित आहे. 

दुसरीकडे विधानपरिषदेतील अभूतपूर्व परिस्थितीचे पडसाद विधानसभेमध्ये नक्कीच उमटण्याची शक्यता आहे. विरोधक कामकाजात सहभागी होणार का, सत्ताधाऱ्यांना कोंडीत कसे पकडणार यांवर विधानसभेतील कामकाज गाजणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :