अखेर वादग्रस्त अधिकारी राधेश्याम मोपलवारांना पदावरून हटवले

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar

मुंबई : 'मी कालच सांगितले आहे. एक महिन्याच्या आत फाॅरेन्सिक चौकशी करण्यात येईल. परंतु विरोधी बाकावर वरून मोपलवारांना हटवण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे मोपलवारांना चौकशी होईपर्यंत पदावरून बाजूला करण्यात येईल,' अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यावेळी तुमच्या काळातील कामाचे हे भ्रष्टाचाराचे आरोप आहोत, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार केला.

राधेश्याम मोपलवार हे एमएसआरडीसीचे संचालक आहेत. त्यांच्या एका आॅडिओ क्लीपचा संदर्भ देत विरोधकांनी राधेश्याम मोपलवार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधानसभेत विरोधकांनी दोन दिवसांपासून लावून धरली आहे. विरोधकांनी मोपलवारांच्या भ्रष्टाचाराचा उल्लेख करत विधानसभेत गोंधळ घातला होता.

विरोधक गोंधळ करत वेलमध्ये उतरले होते. मोपलवारांचा फोटो असलेल्या फलकावर 'काय वाट्टेल ते करा सरकार माझे काहीही माझे काहीही बिघडवू शकत नाही' असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊऩ विरोधक वेलमध्ये उतरले. त्यामुळे पाच वेळा विधानसभा तहकूब करावी लागली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत येत निवेदन सादर केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com