शिमग्यालाच कोकण होरपळतंय; उष्णतेची लाट 

representational image
representational image

पुणे : पूर्वेकडून पश्चिमेकडे काही प्रमाणात वारे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील अनेक भागात उष्णतेची लाट तयार झाली आहे. ही लाट आज (गुरुवारी) कायम राहणार आहे.

उष्णतेच्या लाटेमुळे बुधवारी (ता.२८) कोकणातील भिरा येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत ५.९ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे कमाल तापमानाची ४२.० अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

अरबी समुद्र आणि केरळ ते महाराष्ट्र या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यातच उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रवाह कमी असून काही प्रमाणात वारे पूर्वेकडू पश्चिमेकडे वाहत आहे. त्यामुळे कोकणातील किमान तापमानाबरोबर कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबई येथील कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत सहा अंश सेल्सिअसने वाढ होऊन कमाल तापमान ३६.५ अंश सेल्सिअसवर गेले होते. रत्नागिरी येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत पाच अंश सेल्सिअसने वाढले. तर कमाल तापमानाची ३६.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली. उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. 

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागातही किंचित वाढ झाली आहे. राज्याच्य उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्रातील निफाड येथे १३.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. येत्या रविवार (ता.४) पर्यंत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. पुणे परिसरातही मंगळवार (ता.६) पर्यत आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. 

बुधवारी (ता.२८) सकाळी आठ वाजेपर्यंतचे किमान तापमान व कंसात झालेली घट (अंश सेल्सिअस) :
मुंबई (सांताक्रुझ) २१.० (२), अलिबाग २१.६ (३), रत्नागिरी १९.७ (१), डहाणू २२.४ (४), भिरा १९.० (२), पुणे १४.९ (२), नगर १४.६ (-१), जळगाव १७.४ (२), कोल्हापूर १८.९ (१), महाबळेश्वर १८.६ (३), मालेगाव १८.२ (४), नाशिक १६.२ (३), निफाड १३.०, सांगली १७.१ (१), सातारा १५.८, सोलापूर २०.५ (१), औरंगाबाद १८.६ (४), उस्मानाबाद १६.३, परभणी शहर १८.५ (१), नांदेड १९.० (२), अकोला २०.७ (३), अमरावती २२.० (२), बुलढाणा २०.४ (२), चंद्रपूर २०.० (२), गोंदिया १५.० (-२), नागपूर १६.० (-१), वर्धा १९.४ (२), यवतमाळ २२.० (३)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com