मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा पाहा व्हिडिओतून

टीम ई सकाळ
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत पोचले आहेत. "एकच चर्चा मराठा मोर्चा, असं वातावरण तयार झाले आहे.

मुंबई : मागील वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात मराठा क्रांती मोर्चाचे घोंघावणारे वादळ आज (बुधवार) राजधानी मुंबईत धडकले असून, मुंबईच्या रस्ते भगवे झाले आहेत. मिळेल त्या वाहनाने तर एकजण चक्क सायकलने मुंबईत मोर्चासाठी दाखल झाला आहे.   अखेरचा मराठा क्रांती मूक मोर्चा ऐतिहासिक होण्यासाठी समग्र मराठा संघटनांनी सर्वतोपरी तयारी केली असून, ऐतिहासिक गर्दी होणार हे निश्चित आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांचा हा निर्णायक मोर्चा होईल या इर्षेनं विक्रमी संख्येने मराठा बांधव मुंबईत पोचले आहेत. "एकच चर्चा मराठा मोर्चा, असं वातावरण तयार झाले आहे. या मोर्चासाठी मराठा संयोजक समिती, मराठा स्वयंसेवक, पोलिस व वाहतूक प्रशासनाची तयारी पूर्ण झाल्याचे चित्र होते. 

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले मोर्चात सहभागी

'एक मराठा लाख मराठा' म्हणत मुस्लिम बांधवांचा पाठिंबा

मुंबईचे रस्ते झाले भगवे

मोर्चासाठी बारामती ते मुंबई सायकल प्रवास

मराठा मोर्चात लहानग्यांची हजेरी

मराठा क्रांती मोर्चासाठी सीएसटी स्टेशनवर गर्दी

सेल्फी पॉईंटवर मराठा बांधव एकत्र

कोल्हापूरवासीय मोर्चात सहभागी

आझाद मैदानावर मोर्चाआधी घोषणाबाजी

मराठा मोर्चेकरी हातावर टॅटू काढताना